प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - निपाणी येथे रामनगर परिसरात रहात असलेल्या सुशिला राजाराम शेळके (वय 65) यांचा गुरुवार दि.11/07/2024 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,यातील मयत सुशिला शेळके यांचा शनिवार दि.06/07/2024 रोजी रात्री आठच्या सुमारास मुरगुड रोडवर झालेल्या अपघातात जखमी झाल्या होत्या.त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना गुरुवारी (दि 11) रोजी मृत्यु झाला.
,--------------------------------------
विषारी औषध घेतलेल्या इसमाचा मृत्यु.
कोल्हापूर- आजरा तालुक्यातील बेलेवाडी येथे रहात असलेले महादेव दत्तु लोंखडे (वय 48) यांनी गुरुवार दि.11/07/2024 रोजी रात्री साडे आठच्या सुमारास रहात्या घरात विषारी औषध घेतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे त्याचा उपचार चालू असताना शुक्रवार दि.12/07/2024 रोजी रात्रीच्या सुमारास मृत्यु झाला .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
,--------------------------------------
-