विश्वजीत जाधव यांची पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - बनावट कागदपत्राचा वापर करून सीपीआर रुग्णालयास सर्जिकल साहित्याचा पुरवठा करण्याचा ठेका आपल्याला मिळण्यासाठी व्हि.एस.एंटरप्रायझेस कंपनीचे मयुर लिंबेकर यांनी खोटे कागदपत्रे तयार करून पाच कोटी रुपयांचे साहित्य सीपीआर रुग्णालयास पुरवठा केल्या प्रकरणी त्यांच्यावर फसवणूकची कारवाई करावी.अशी मागणी विश्वजीत जाधव आणि गौरव पाटील यांनी पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यातील मुंलुड येथील रुग्णालयाचे लेटरप्यड वापरून आपल्यालाच ठेका मिळावा यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि शासनाची फसवणूक करण्याच्या दृष्टीने मनाप्रमाणे दर दाखवून पत्रव्यवहार करून दिल्लीतील कंपनी कडुन खरेदी केल्याचे दाखवून पाच कोटी रुपयांचा औषधांचा ठेका घेतला.
या बाबतची तक्रार 22 जुलै रोजी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली होती.यावर कोणताच निर्णय झाला नाही.त्यामुळे बोगस दरपत्रकानुसार सीपीआर रुग्णालयाची फसवणूक केल्या प्रकरणी मयुर लिंबेकर यांच्या कंपनीसह सीपीआरच्या दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
------------------------------------------------------------------
दीड वर्षाच्या मुलीचा ठसका लागून मृत्यु.
कोल्हापूर - शाहुवाडी तालुक्यातील गोडोली येथील सारण्या विकास पाटील (वय दीड वर्षे.सध्या रा.नागाव येथे मनाडे यांच्या घरी भाड्याने) हिला बुधवार दि.31/07/2024 रोजी रात्रीच्या सुमारास अचानक ठसका लागल्याने ती बेशुद्ध झाल्याने तिला बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.