वर्क ऑर्डर देण्यासाठी 9 हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी ताब्यात.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी 9 हजारांची लाच घेताना  ग्रामविकास अधिकारी गणपत धनाजी आदलिंग (वय 57.रा.कृष्णतारा अपार्टमेंट प्लॉट नं.2.मराठा कॉलनी कं.बावडा .कोल्हापूर) याला 9 हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडून कारवाई केली असून त्याच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

अधिक माहिती अशी की,तक्रारदार हे कॉन्ट्रॅकटर असून हातकंणगले तालुक्यातील मौजे कबनूर येथे वॉर्ड नं.2 मध्ये पाईपलाईन बसविण्याची निवीदा भरली होती.या कामाबाबत ग्रामविकास अधिकारी आदलिंगे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी 9 हजारांची लाचेची मागणी केली असता तक्रारदाराने लाचलुचपतच्या विभागाकडे तक्रार केली.लाचलुचपतच्या पथकाने याची पडताळणी करत सोमवार दि.22/07/2024 रोजी  सापळा रचून तक्रारदाराकडुन 9 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडून लाचलुचपतच्या पथकानी कारवाई केली.

ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस निरीक्षक बापू साळुंखे ,पोलिस विकास माने,सुनिल घोसाळकर ,सचिन पाटील,संदिप पवार आणि सचिन पाटील यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post