हणबरवाडीची गरोदर महिला अपघातात ठार.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर  - कागल येथे राष्ट्रीय महामार्ग चार येथील कागल आरटीओ ऑफिस जवळ दुचाकीला कारची धडक बसल्याने गरोदर महिला जागीच ठार झाली तर पती आणि दोन वर्षाचे लहान बाळ गंभीर जखमी झाले आहे.ही घटना मंगळवार दि.30/07/2024 रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.या अपघातात सुशिला रविंद्र खोत (वय 26 रा.हणबरवाडी ,कोगनोळी) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.तर रविंद्र बाळासो खोत (वय 30) आणि मुलगा विराज(वय 2) हे गंभीर जखमी झाले आहेत.

अधिक माहिती अशी की ,हणबरवाडी (कोगनोळी)येथील रविंद्र खोत आणि पत्नी सुशीला खोत आपल्या लहान बाळासह कागल येथे खाजगी रुग्णालयात तपासणी साठी दुचाकी वरुन कागल कडे जात असताना  कागल येथे आरटीओ ऑफिस जवळ आले असता त्यांच्या बाजूने कंटेनर जात असताना पाठी मागून येत असलेल्या कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकी वरील पत्नी सुशीला उडून कंटेनर खाली सापडल्याने त्या जागीच ठार झाल्या.सुशीला या नऊ महिन्याच्या गरोदर होत्या.याच बरोबर त्यांचे पती आणि लहान बाळ जखमी झाले आहेत.यातील जखमी रविंद्र आणि बाळाला कोल्हापूर येथे सिटी प्राईड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सुशीला यांचा मृतदेह कागल येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवांईकांच्या ताब्यात देण्यात आला.या अपघाताची माहिती कागल पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पहाणी केली.

कागल येथे राष्ट्रीय महामार्गावर आरटीओ ऑफिस असून येथे कागदपत्रे तपासणी साठी वहाने थांबत असतात.या मुळे येथे अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत.संबंधित आरटीओ ऑफिस मध्ये कागदपत्रे तपासणी साठी महामार्गावर लावण्यात येणारी वाहने बंद करण्याची मागणी घटना स्थळी होत होती . या अपघाताची नोंद कागल पोलिस ठाण्यात झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post