प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- हातकण्ंगले तालुक्यातील साजणी येथील जय हनुमान परिसरात रहात असलेला निवास बजरंग पाटील (वय 29) याला रविवार दि.20/07/2024 रोजी लक्ष्मी इंडस्ट्रीज यांच्या युपीओ कंपनीत इंजिनीअरिंग कंपनीच्या बाहेर झालेल्या मारहाणीत जखमी होऊन मुक्का मार लागल्याने त्यांना प्रथम तारदाळ येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
------------------------------------
विषारी औषध घेतल्याने उपचारास दाखल.
कोल्हापूर- करवीर तालुक्यातील महे येथे रहात असलेला बाळासो भैरु कांबळे (वय 28.रा.धुदरेटेक, महे) याने रविवार दि.21/07/2024 रोजी रहात्या घरात कोणतेतरी विषारी औषध सेवन केल्याने बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
Tags
कोल्हापूर