प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- राजारामपुरी परिसरात असलेल्या तवणाप्पा पाटणे हायस्कूलच्या जवळच्या रस्त्यावर खेळताना शौर्य सुर्यकांत भोसले (वय 14.रा.राजारामपुरी 4 थी गल्ली) या शाळकरी विद्यार्थांवर एका माकडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने त्यातुन वाचण्यासाठी पळुन जात असताना रस्त्यात पडून जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात शिक्षकांनी दाखल केले.हा प्रकार शनिवार दि.20/07/2024 रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडला.
यावेळी शिक्षकांनी माहिती दिली की,शाळेजवळच्या रस्त्यावर या शाळेतील काही मुले खेळत असताना तेथे असलेल्या झाडावर माकडांचा कळप बसला होता.त्यातील एका माकडांने खेळत असलेल्या विद्यार्थावर उडी मारून हल्ला चढवला त्यावेळी घाबरलेल्या शाळकरी विद्यार्थानी पळ काढला.त्यातील शौर्य हा पळत जात असताना रस्त्यात पडून गंभीर जखमी होऊन त्याच्या डोक्यास मार लागल्याने शाळेचे मुख्याध्यापक सतीश भोसले आणि शिक्षक रघुनाथ मांडरे यांनी तात्काळ बेशुध्दावस्थेत असलेल्या शौर्य याला जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात दाखल केले .काही वेळाने शुध्दीवर आला.पण त्याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले.या घटनेची माहिती शौर्यच्या पालकांना शाळेत बोलवून शिक्षकांनी दिली.