विषारी औषध घेतलेल्याचा मृत्यु.





प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-पन्हाळा तालुक्यातील कं .ठाणे येथे रहात असलेले तातोबा नरसिंगा महाडिक (वय 58.रा.महाडिकवाडी ,कं.ठाणे)यांचा गुरुवार दि.11/07/2024 रोजी सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना रात्री दीडच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की ,यातील मयत यांनी दि.18 जून रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास  रहात्या घरात दारुच्या नशेत प्यराडी नावाचे विषारी औषध सेवन केले होते.त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना आज त्यांचा मृत्यु झाला.

---------------------------------------

कागल एमआयडीसी येथे अपघातात तरुण जखमी.

कोल्हापूर- चिकोडी तालुक्यातील जनवाड येथे रहात असलेला शिवम पिरगोंडा  कुडचे (वय40) याचा गुरुवार दि.11/07/2024 रोजी सकाळी एकच्या सुमारास 

 हुपरी येथे झालेल्या अपघातात जखमी झाल्याने 108 अय्म्बुलन्स गाडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की ,यातील जखमी पंचताराकीत एमआयडीसी येथे एका कंपनीत नोकरीस असून आज सकाळी आपल्या मोटारसायकल वरुन (गाडी नं.KA-H-3370) कामाला जात असताना हुपरी परिसरात झालेल्या अपघातात जखमी झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post