प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- मोटरसायकल आडवी मारल्याने भर रस्त्यात मारामारी करणाऱ्या अमोल रमेश पोवार ,वैभव विनोद पोवार ,सुजल अशोक पोवार ,कृणाल प्रकाश पोवार (सर्व रा.महाराणा प्रताप चौक ,कोल्हापूर )यांच्यासह जावेद सिंकदर मुल्ला ,सुलतान अस्करअल्ली सय्यद , आसिफ यासीन शेख (रा.सरनाईक वसाहत) आणि जुनेद जावेद शेख (रा.जवाहरनगर ) अशा आठ जणांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली.
अधिक माहिती अशी की,दुचाकी आडवी मारल्याने दोन गटात झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या पथकाने या दोन गटातील संशयीताची धरपकड करून महाराणा प्रताप चौक आणि जवाहरनगरातील आठ जणांना अटक करून त्यांची चांगलीच धुलाई केली.हा प्रकार लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नर चौकात घडला होता.
यातील मारामारी केलेले कळे येथे एका हॉटेलात जेवणा साठी गेले होते.परत येताना दुचाकी आडवी मारल्याने दोन गटात शाब्दीक वाद वाढ़त गेल्याने एकमेकाचा पाठलाग करत लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर येथे अमोल पोवार दुचाकी वरुन खाली पाडुन लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याने अमोलने फोन करून आपल्या तिघां मित्रांना बोलावून घेऊन त्यांच्यात तुफाण हाणामारी झाली.याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी याची दखल घेत घटना स्थळी दाखल झाले पण पोलिस येण्या अगोदर मारामारी करणारे गायब झाले होते.त्या ठिणाहून जात असलेल्या एका व्यक्तीने मारहाणीचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी पोलिस अधिकारी यांची चांगलीच कान उघडणी करताच हद्दीतील पोलिस कामाला लागले.तो प्रर्यत स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांनी पोलिस पथक पाठवून दोन्ही गटातील आठ जणांना अटक करून त्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात नेऊन चांगलीच धुलाई करत पोलिसांनी त्यांचा माज उतरविल्याचे समजते.
"या प्रकरणामुळे तेथुन ये -जा करण्यारया वाहनधारकांना मारामारी करणारे हे आठ जण दारुच्या नशेत असल्याने मोठ्याने शिवीगाळ करत होते.यामुळे उपस्थित लोकांना आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला."