प्रेस मीडिया लाईव्ह
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- विशाळगड येथे झालेल्या अतिक्रमणच्या निमीत्ताने झालेला हिंसाचार ,जाळपोळसह घरांची आणि गाड्याची केलेली तोडफोड व दगडफेक करून एका घटकाला केलेले टार्गेट यांचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या नेत्यासह सर्व पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी सदभावना यात्रा आयोजित केली होती.या करवीर नगरीत सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितपणे गुण्या गोविंदाने रहात असून सर्वाना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करण्यारयां छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांच्या प्रेरणेतुन एकोपा करून रहात असलेले असल्या भ्याड हल्ल्याला भिक घालणार नाहीत असा संदेश देत कोल्हापुरातील सर्व लोकांनी सहभागी होऊन सदभावना यात्रा काढ़ली.यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते.
ही यात्रा सिध्दार्थनगर परिसरात असलेल्या नर्सरी बागेच्या शाहु समाधी स्थळा पासून सुरु होऊन चिमासाहेब चौक ,सीपीआर,महानगरपालिका मार्गावरुन जाऊन शिवाजी महाराज चौकात याची सांगता झाली.या यात्रेचे नेतुत्व खा.छत्रपती शाहू महाराज ,आ.सतेज पाटील,आ.जयश्रीताई जाधव, मालोजीराजे , शारंगधर देशमुख यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते.या ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकारी हजर राहून पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.