जिल्हा पोलीस दलातील उमेदवारांची लेखी परीक्षा पार पडली.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- कोल्हापूर जिल्हयातील उमेदवारांची शिपाई पदासाठी स्वामी विवेकानंद कॉलेज मध्ये  शनिवार दि.13/07/2024 रोजी आयोजित केली होती.सदरची परिक्षा सीसीटिव्हीच्या देखरेखीखाली अत्यंत कडक बंदोबस्तात पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबध्द आणि पारदर्शक पध्दतीने पार पडली.

लेखी परीक्षा साठी 1496 उमेदवारांपैकी 1472 उमेदवारांनी लेखी परीक्षा साठी उपस्थित होते.आणि 24 उमेदवार गैरहजर होते.या परिक्षेसाठी पोलिसांच्या कडुन योग्य नियोजन करण्यात आले होते.पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी गेल्या मंगळवार पासून हॉल तिकीट देण्याचे चालू केले होते.कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.हि प्रक्रिया दि.19 जून ते 28 जून दरम्यान मैदानी चाचणी परिक्षा घेऊन 3 ते 9 जुलै च्या कालावधीत चालक भरतीची प्रक्रिया पार पडली होती.त्या मध्ये 1हजार 496 उमेदवार पात्र ठरले होते.त्यांची आज लेखी परीक्षा घेण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post