प्र.चिखली येथे एकाची आत्महत्या.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- करवीर तालुक्यातील प्र.चिखली येथील वसंत बाबूराव पाटील (वय.60) यांनी मंगळवार दि.09/07/2024 रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास प्र.चिखली येथे असलेल्या बाळू पाटील पाण्ंद परिसरात आंब्याच्या झाडाच्या फांदीला नॉयलॉन दोरीने गळफास लावून घेतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा गळ्यात सोडवून बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी बुधवार दि.10/07/2024 रोजी रात्रीच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस

 चौकीत झाली असून.त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही..

---------------------------------------------------------------

  अपघातात जखमीचा उपचारा    दरम्यान मृत्यु.

कोल्हापूर- कागल तालुक्यातील व्हनाळी येथे रहात असलेले उमाजी पंडीत पालकर (वय 54) यांचा गुरुवार दि.27 /06/2024  रोजी सकाळी अकराच्या सुमारास आपल्या मोटारसायकल वरुन मुरगुडकडे लागवड आणण्यासाठी जात असताना चिमगाव येथे एका मंगलकार्यालय  जवळ त्यांच्या आणि तेथुन जात असलेल्या फोर व्हीलर गाडीच्या धडकेत ते गंभीर जखमी झाल्याने  प्रथम राजारामपुरी येथील सिटी हॉस्पिटल मध्ये उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सोमवार दि.08/07/2024 रोजी सायंकाळच्या सुमारास सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना बुधवार दि.10/07/2024 रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.त्यांच्या पश्च्यात पत्नी,एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

---------------------------------------------------------------------

अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यु.

कोल्हापूर- पन्हाळा तालुक्यातील मोहरे येथे पाटील गल्लीत रहात असलेले सुहास संपतराव तोररस्कर (वय 42) यांचा मंगळवार दि.09/07/2024 रोजी रात्री साडे आठच्या सुमारास माले रोडवर असलेल्या काळेफाटा झालेल्या अपघातात जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी कोडोली येथील यशंवत आयुव्रेदीक हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते.त्यांना पुढ़ील उपचारासाठी मंगळवार दि.09/07/2024 रोजी  रात्री उशीरा  सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा बुधवार दि.10/07/2024 रोजी रात्रीच्या सुमारास  मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

  यातील मयत हे गावात इलेक्ट्रीकची कामे करत असत त्यांच्या पश्च्यात पत्नी ,एक मुलगा आणि मुलगी आहे.

----------------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post