प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- जिद्द फौंडेशनच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम "शृंगार माझा अधिकार" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील विधवा महिलांचा मान सन्मान करण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेऊन त्यांच्यात जगण्याची जिद्द निर्माण केली.हा कार्यक्रम शनिवार दि.06/07/2024 रोजी रायगड कॉलनीत असलेल्या चिले हॉल मध्ये पार पडला.या कार्यक्रमाचे सारीका भास्कर यांनी केले असून मान्यवरांच्या उपस्थितीत विधवा महिलांचा स्वामी शांती प्रकाश ट्रस्ट कडुन मिळालेला माहेरचा आहेर म्हणुन साडी चोळीसह नारळ आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.या महिलांचा प्रथमच एका भरगच्च कार्यक्रमात सन्मान झाल्याने त्या भारावून गेल्या त्या वेळी त्यांच्या डोळ्यातुन आनंदाश्रु वहात होते.या वेळी सन्मान झालेल्या विधवा महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली.हा कार्यक्रम पार पडण्यासाठी व्यवस्थित पार पडण्यासाठी आमच्या जिद्द फौंडेशनच्या महिलांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे जिद्द फौंडेशनच्या संस्थापिका गिताजंली डोंबे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात मला नेहमीच मैत्रिणीचा सहवास मिळाल्याचे सांगितले .
या कार्यक्रमास उद्योगपती रमेश तनवाणी ,सामाजिक कार्यकर्ते नविता नाईक ,तेजस्विनी काशीद,आशाराणी थडगे,नविता नाईक ,संरपंच संजय शिंदे ,विजय शिंदेसो ,अभिनेता मदन पंलगे वर्षा जोशी ,प्रियांका पाटील ,अश्विनि रामाणे ,अश्विनी चिले ,सारीका भास्कर आणि तनश्री जाधव यांच्यासह जिद्द फौंडेशनच्या संस्थापिका गिताजंली डोंबे उपस्थित पार पडला.शेवटी या कार्यक्रमाचे आभार मदन पंलगे यांनी मानले.
--------------------------------------------------------------++
शिंगोशी मार्केट येथे भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यु.
कोल्हापूर- शिंगोशी मार्केट येथे भाजी विक्रेत्या मंगल भगवान ढ़ेसले (वय 76.रा.बी वॉर्ड ,भारतनगर ,साळोखेपार्क ) यांचा रविवार दि.07/07/2024 रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास शिंगोशी मार्केट मंगळवार पेठ येथे अचानक चक्कर येऊन बेशुध्दावस्थेत पडल्याने त्यांना बेशुध्दावस्थेत त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.