पोलिस भरती साठी आलेल्या उमेदवारांना ईडब्ल्युएसचा लाभ मिळणार नाही.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- पोलिस दलाच्यावतीने पोलिस भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती.या पोलिस भरती साठी अनेक ठिकाणाहून उमेदवार आले होते.या मध्ये मराठा उमेदवारांनी पोलिस भरतीची चाचणी दिली होती.पण ज्या मराठा उमेदवारांनी पोलिस भरती साठी ईडब्ल्युएस (आर्थिक दुर्बल घटक) या प्रवर्गातुन अर्ज भरलेल्यांना ईडब्ल्युएसचा लाभ मिळणार नसून त्या ऐवजी एसईबीसी(सामाजिक व शैक्षणिक इतर मागास प्रवर्ग) ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) आणि खुल्या प्रवर्गाची निवड करावी लागणार असल्याचे परिपत्रक प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी मंगळवारी (ता.16) रोजी जारी केले.या मुळे पोलिस भरतीचा निकाल लांबण्याची शक्यता आहे.मराठा उमेदवारांना ईडब्ल्युएस आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.17हजार पोलिसांची भरतीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली असून अनेक मराठा उमेदवारांनी यात सहभाग घेतला.काही जिल्हयात चाचणी नंतर लेखी परीक्षाही घेण्यात आल्या.आरक्षीत निकाल जाहीर होण्या अगोदरच अपर पोलिस महासंचालक यांनी या बाबतचे परिपत्रक जाहीर केले.ईडब्ल्युएस प्रवर्गातुन अर्ज भरलेल्यांना या प्रवर्गा ऐवजी एसईबीसी ,ओबीसी किंवा खुला प्रवर्गाचा पर्याय द्यावा .त्या नंतरच अंतिम निकाल जाहीर करण्याचे निर्देश सर्व पोलिस अधीक्षक कार्यालये आणि पोलिस आयुक्तालयांना दिले आहेत.निवड झालेल्या उमेदवारांना एसईबीसी किंवा ओबीसी प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत मिळणार आहे.

---------'------------------------------

कोल्हापूरात 23 उमेदवार .

कोल्हापूरात पोलिस शिपाई पदाच्या 154 जागासाठी झालेल्या प्रक्रियेत ईडब्ल्युएस प्रवर्गातुन 23 उमेदवारआहेत.या सर्व उमेदवारांना बोलावून घेऊन ईडब्ल्युएस ऐवजी अन्य प्रवर्गाचा प्रर्याय दिला जाणार आहे.आणि उमेदवारांच्या कडुन हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post