प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
इंचलकरंजी -हातकंणगले तालुक्यातील चंदुर येथील प्रशांत रावसाहेब मस्कर (वय 32 रा.आभाडफाटा ,चंदुर) याने शनिवार दि. 06/07/2024 रोजी पावणे दहाच्या सुमारास गळफास लावून घेतला होता त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी प्रथम आयकॉन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.पुढ़ील उपचारासाठी मंगळवार दि.09/07/2024 रोजी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
-----------------------------------------------------------
अपघातात जखमी.
भुदरगड - मुधाळतिट्टा येथे रहात असलेले भिमराव गोंविद सुतार (वय 55.) यांचा सोमवार दि.08/07/2024 रोजी कूर येथे असलेल्या हॉटेल गारवा येथुन रात्री साडे आठच्या सुमारास पायी चालत जात असताना समोरुन येणारया छोटा हत्ती या वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या भिमराव सुतार यांना त्यांच्या उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
-------------------------------------
चाकू हल्ल्यात तरुण जखमी.
कोल्हापूर-कंळबा परिसरातील बापूरामनगर येथे रहात असलेला अरुण संभाजी मोरे (वय.30) याच्यावर
मंगळवार दि.09/07/2024 रोजी रात्री दीडच्या सुमारास आर.के.नगर ते पाचगाव परिसरात असलेल्या सहजीवन सोसायटी जवळ त्याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यात जखमी झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी
-उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे..