करनूर येथे झालेल्या कोयता हल्ल्यातील आणखी दोघांना अटक .

  16 तारखेप्रर्यत पोलिस कोठडी.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- कागल तालुक्यातील करनूर येथे झालेल्या कोयता हल्ल्यातील आणखी दोघां आरोपीना कागल पोलिसांनी अटक केली.यातील आरोपींची संख्या झाली असून या गुन्हयांतील सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.या सहा जणांना कागल पोलिसांनी कागल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 16 जुलै प्रर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आदेश प्रकाश कांबळे (वय 21रा.चंदूर )आणि सुशांत महेश जरळी (वय 21रा.उळगड्डी खानापूर ,ता.हुक्केरी) हे दोघे आरोपी फरार होते.त्यांना आज शनिवारी कागल पोलिसांनी अटक केली.

  या खूनातील सहा जणांनी सोमवार (दि.08) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मोटारसायकल वरुन शेख मळ्या पासून जात असताना रस्त्यावरुन जात असलेल्या गुलाब शेख यांना मोटारसायकल घासून गेल्याने त्यांच्यात वाद होऊन या सहा जणांनी संगनमत करुन गुलाब शेख यांच्या डोक्यात कोयता मारुन गंभीर जखमी करून पळून गेले होते.त्या हल्ल्यात गुलाब शेख यांचा गुरुवार (दि.12) रोजी मृत्यु झाला होता. 

 यातील फरार झालेल्या सहा पैकी चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांनी आणि त्यांच्या पथकाने इंचलकरंजी परिसरात प्रमोद धनवडे ,आकाश कांबळे,सौरभ जाधव आणि सम्मेद ऐनापुरे यांना अटक केली होती.

 याचा पुढ़ील तपास कागल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार करीत आहेत.

---------------------------------------------------------------------

कॉट वरुन खाली पडलेल्या महिलेचा मृत्यु.

कोल्हापूर- शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे असलेल्या जानकी वृध्दाश्रमात कॉट वरुन खाली पडून जखमी झालेल्या आक्काताई रामदास खोत (वय 65.रा.पवारवाडी भैरेवाडी ,कुंरुदवाड) यांचा सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना शनिवार दि.13/07/2024 रोजी रात्री पावणे तीनच्या सुमारास मृत्यु झाला.

अधिक माहिती अशी की,यातील मयत या जानकी वृध्दाश्रमात रहात होत्या.त्या.दि.02/07/2024 रोजी कॉटवरुन खाली पडल्याने त्या जखमी झाल्याने त्यांना कुंरुदवाड येथे सिध्दीविनायक हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते.तेथुन पुढ़ील उपचारासाठी दि.08/07/2024 रोजी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना आज शनिवार दि.13/07/2024 रोजी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post