प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-करवीर तालुक्यातील आडूर येथे रहात असलेला विजय सदाशिव चौगुले (वय 35 ) याने शनिवार दि.06/07/2024 रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास रहात्या घरात पंख्यांच्या हुकाला नॉयलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,यातील मयत हा विजय हा आडूर येथे आपल्या कुंटुबिया समवेत रहात असून तो शेती करत ट्रक ड्रायव्हर ही होता.शनिवारी रात्रीच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून हा प्रकार केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.नातेवाईकांनी घटना स्थळी जाऊन या बाबतची माहिती आडूर गावच्या पोलिस पाटलांना फोन वरुन दिली असता पोलिस पाटील यांनी घटना स्थळी जाऊन याची माहिती त्यांनी या बाबतची तक्रार करवीर पोलिसांना देऊन आहे त्या स्थितीत मृतदेह सीपीआर रुग्णालयात त्यांचे नातेवाईक घेऊन आले.