कंळबा जेल मध्ये सांगलीचे 80 कैदी स्थ्ंलांतरीत.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर - कोल्हापुर जिल्हयासह सांगली येथेही मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून सांगली येथे असलेल्या मध्यवर्ती जेलला पुराचा फटका बसण्याची शक्यता असल्याने या जेल मधील 80 कैद्यांना कोल्हापुरातील कंळबा जेल मध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.

या कैद्यांना शुक्रवारी सकाळी खबरदारी घेत सुरक्षीतपणे स्थलांतरीत केल्याची माहिती कारागृह प्रशासनाकडुन देण्यात आली. पूर परिस्थितीच्या पाश्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सांगली जिल्ह्या प्रशासनाने कैद्यांना इतर ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.त्या मुळे 80 कैद्यांना शुक्रवारी हलविण्यात येऊन यात 60 पुरुष कैद्यासह 20 महिलांचा कैद्याचा समावेश आहे.कृष्णा नदीच्या पातळीत होत असलेली वाढ़ लक्षात घेऊन आणखी काही कैद्यांना स्थलातरीत करण्याची शक्यता आहे.याच बरोबर अन्य जिल्हयातील कैद्यांनाही दोन चार दिवसात हलविण्याची शक्यता आहे.

दरम्यान जेल मधील खूनासह मोबाईल,आणि जिवघेणा हल्ला प्रकरणातील गुन्हे दाखल असलेल्या कैद्यांना अन्य जिल्हयातील जेल मध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.यात अमरावती,नागपूर ,यवतमाळ आणि अकोला या जेलात 25 कैद्यांचे  स्थलांतर करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post