करनूर येथे झालेल्या कोयता हल्ल्यातील चौघांना अटक .

   स्थानिक गुन्हे अन्वेषन पथकाची कारवाई.

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- कागल तालुक्यातील करनूर येथे गुलाब बाबालाल शेख (वय 60) या वृध्दाचा डोक्यात कोयता  मारून गंभीर जखमी केल्या प्रकरणी आरोपी प्रणोंत शिवाजी धनवडे (रा.कबनूर ,ता.हातकंणगले ) आकाश नरेश कांबळे (रा.चंदुर ,ता.हातकंणगले )सौरभ दिनकर जाधव (रा.चंदुर ,ता.हातकणंगले) सम्मेद विजय ऐनापुरे (रा.चंदूर ,ता.हातकंणगले )  यांना  स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या पथकाने अटक करून पुढ़ील तपासासाठी कागल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


अधिक माहिती अशी की ,यातील मयत याचा सोमवार दि. 08/07/2024 करनूर येथे शेख मळा परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास डोक्यात कोयता मारल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले होते.त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना गुरुवार दि.11/07/2024 रोजी मृत्यु झाला होता.यातील हल्लेखोर घटना घडल्या पासून फरारी होते.कागल पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषन पथक या संशयीताचा शोध घेत असताना दोन मोटारसायकलवरील सहा जणांनी  हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या प्रकरणाची माहिती घेत असताना हा गुन्हा अदया,सोम्या व पत्या आणि त्यांच्या तीन साथीदारानी केल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या पथकाने इंचलकरंजी परिसरात या चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानी त्याचे साथीदार आदित्य प्रकाश कांबळे (रा.चंदूर ) आणि सुशांत जरळी (रा.हलकर्णी) अशी हल्लेखोरांची नावे असून त्यांच्या अधिक चौकशी केली असता वरील सहा जण मतीवडे येथे शर्यती घोडा खरेदी साठी दि.08/07/2024 रोजी  गेले होते.तेथुन परत येत असताना सायंकाळी साडे सहाच्या सुमारास शेख मळा परिसरात यातील मयत गुलाब शेख यांना आरोपीची मोटारसायकल घासल्याने यांच्यात वाद झाल्याने आरोपीनी संगनमत करुन गुलाब बाबालाल शेख यांच्या डोक्यात कोयता मारुन जखमी करून मोटरसायकल सोडून पळून गेले होते.यातील सहा आरोपी पैकी चौघांना ताब्यात घेऊन त्यांना कागल पोलिसांच्या ताब्यात देऊन  बाकी दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत, करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी निकेश खाटमोडे -पाटील,उपविभागीय  आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ,पोलिस राम कोळी,सुरेश पाटील,विनायक चौगुले,प्रविण पाटील ,विनोद कांबळे आदीने केली.

Post a Comment

Previous Post Next Post