प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - महाबळेश्वर येथे असलेल्या हॉटेल मालकाची एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केलेला संशयीत हणुंंमंत विष्णुदास मुंढ़े (रा.ताथवणे ,ता.मुळशी जि.पुणे) याला गुन्हें अन्वेषनच्या पथकाने (सीआयडी) अटक केली आहे.याचा तपास कोल्हापूर विभागाच्या सीआयडीच्या अधिक्षक मनिषा दुबुले ह्या करीत असून अन्य संशयीताचा शोध घेत असल्याची माहिती दुबुले यांनी दिली.
यातील संशयीत मुंढ़े यांच्यासह आठ जणांनी महाबळेश्वर येथील एका हॉटेल व्यावसायिकांला मद्यविक्रीचा परवाना मिळवून देण्याचं आमिष दाखवून याला अडीच कोटी रुपये खर्च येईल असे सांगत गेल्या वर्षभरात वेळोवेळी एक कोटी पाच लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचे दिसून येताच हॉटेल मालकांने या बाबतची फिर्याद वाई पोलिस ठाण्यात दिली होती.या गुन्हयांचा तपास गुन्हें अन्वेषन पथकाकडे सोपवण्यात आला होता.त्यानुसार अधिक्षक यांच्या पथकाने संशयीत मुंढ़ेला अटक केली.