पत्नीच्या हल्ल्यात पती जखमी.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-कौटुंबिंक वादातुन पत्नीने पतीला लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी यास्मिन रियाज जतकर (वय34.बावडा वसाहत,राजेंद्रनगर )यांच्या विरुध्द राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.झालेल्या मारहाणीत रियाज बशीर जतकर (वय34)हे जखमी झाले आहेत.हा प्रकार बुधवार दि.10/07/2024 रोजी घडला असून याची फिर्याद सोमवारी दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक कारणातुन पती पत्नीत मतभेद निर्माण झाले होते.पतीने पत्नीला घराबाहेर जाण्यास मज्जाव करून मोबाईल वापरण्यासही मज्जाव केल्याने त्या दोघांतील वाद वाढ़त गेल्याने पत्नीने पतीला लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले.याची माहिती पोलिसांना दिल्यास तुझ्यासह तुझ्या आईवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची फिर्यादीत म्हटले आहे.जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.

----------------------------------------

जरगनगर येथे घरफोडीत 50 हजारांचे दागिने लंपास .

कोल्हापूर- जरगनगर येथील दिपक वासुदेव ठकार (वय 72.रा.मालती कृष्ण प्लॉट नं 35,रा.जरगनगर) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातील सोन्याच्या दोन अंगठ्या लंपास केल्याची घटना घडली.हा प्रकार दि.15ते 21जुलै दरम्यान घडला होता.याची फिर्याद सोमवारी (22) रोजी ठकार यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली.

----------------------------------------

दहशत निर्माण करण्यारया दोघांना अटक.

कोल्हापूर-लक्ष्मीपुरी परिसरात असलेल्या पान लाईन येथे आरडा ओरडा करून हातात कोयता नाचवत दहशत निर्माण करण्यारया लक्ष्मीपुरी पोलिसांनी यश महेश साळोखे(वय28) व अफताब अकबर मोमीन (29.दोघे रा.सोमवार पेठ) यांना अटक केली.हा प्रकार शनिवारी (दि.20) रोजी रात्रीच्या सुमारास धारदार कोयता नाचवत दहशत माजवत होते.याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली असता पोलिस घटना स्थळी पोहोचताच या दोघांनी पळ काढला असता या दोघांना सीसीटिव्ही फुटेज वरुन ओळख पटवून पोलिसांनी या दोघांना अटक केली.या घटनेची फिर्याद पोलिस हवालदार बंडू लोहार यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिल्याने या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------------------

परिते येथे एकास मारहाण.

कोल्हापूर- करवीर तालुक्यातील परीते येथे जागेच्या आणि शेतीच्या वादातुन झालेल्या मारहाणीत राहुल बाळकृष्ण शंकरशेट्टी (वय40.) यांना मारहाण करण्यात आली.हा प्रकार रविवार दि.21/07/2024 रोजी सकाळी अकराच्या सुमारास परीते येथे गणपती मंदिरा जवळ घडली आहे.शेतात पाणी सोडल्याच्या कारणातुन वाद होऊन संतोष आण्णासो शंकरशेट्टी (रा.परीते) यांने राहुल यांना मारहाण केली.याची फिर्याद राहुल यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली आहे.त्यानुसार संतोषवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post