प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-कागल तालुक्यातील करनूर येथे झालेल्या खूनी हल्ल्यातील जखमी झालेले गुलाब शेख यांच्या डोक्यात कोयत्याचा वर्मी घाव बसल्याने त्यांची प्रकृती गंभीर असून यातील संशयीत हल्लेखोर अद्याप गायब असल्याने पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.हा प्रकार सोमवार दि.(08) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास शेख मळा परिसरात घडला होता.
मंगळवारी सायंकाळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री निकेश खाटमोडे -पाटील आणि कागल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक लोहार यांनी घटना स्थळी भेट देऊन रस्त्यावर पडलेल्या रक्ताच्या डागाची पाहणी करून पुढ़ील तपासासाठी मार्गदर्शन केले.ही घटना कोणत्या कारणामुळे घडली याची माहिती संशयीत सापडल्यावरच समजणार आहे.पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास गतीमान केला असून पोलिस निरीक्षक लोहार हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
----------------------------------------
पायरीवरुन पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यु.
कोल्हापूर-मंगळवार पेठ येथे रहात असलेले संजय सदाशिव मोहिते (वय 63) हे सोमवार दि.08/07/2024 रोजी रात्री अडीचच्या सुमारास रहात्या घरात पायरीवरुन पाय घसरून पडून त्यांच्या डोकीस मार लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात केले होते.त्यांच्यावर उपचार चालू असताना मंगळवार दि.09/07/2024 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
----------------------------------------
बांधावरुन पडून महिलेचा मृत्यु.
भुदरगड - भुदरगड तालुक्यातील नांदोली येथील राजश्री राजाराम पाटील (वय 41) या मंगळवार दि.09/07/2024 रोजी दुपारी एकच्या सुमारास नांदोली येथे असलेल्या कोंडाळ नावाच्या शेतात बांधावरुन पडल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी बेशुध्दावस्थेत प्रथम गारगोटी येथील रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी पावणे दहाच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की यातील मयत ह्या नेहमी आपल्या पती समवेत शेतात जात होत्या.आज ही सकाळी दहा वाजता आपल्या पती समवेत शेतात गेल्या होत्या.परत येताना हा प्रकार घडल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.त्यांच्या पश्च्यात पती,एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचे समजते.