प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असुन नदी,नाले आणि धरणे तुंडब वाहून धोका पातळीवरुन ओसंडून वाहू लागले आहेत.या मुळे कोल्हापुरसह सांगली जिल्ह्याला महापुराची फटका बसण्याची शक्यता आहे.अशावेळी महापूराची तीव्रता कमी करण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातुन किमान 3 लाख क्युसेस पाणी विसर्ग सुरु करणे आवश्यक आहे.
पूर परिस्थितीच्या अनुशंगाने तात्काळ एक उच्चस्तरीय समिती नियुक्त करावी.त्याच प्रमाणे महाराष्ट्रासह कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या अधिकारयांत समन्वय ठेवावा.अशी मागणी केंद्रीय जलसंपदामंत्री नामदार सी .आर .पाटील यांच्याकडे खा.धनंजय महाडिक यांनी केली असून त्या बद्दलचे पत्र (निवेदन )खा.महाडिक यांनी दिल्लीत ना.पाटील यांच्याकडे सुपुर्द केले.राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर स्वयंचलीत दरवाजे खुले होतात आणि महापुराचे संकट कोल्हापुरात गंभीर बनते.
अशा वेळी विसर्ग वाढ़विणे गरजेचे आहे.महापुराचे संकट टाळण्यासाठी,जीवीतहानी व वित्त हानी टाळण्यासाठी तात्काळ पावले उचललं जाणे आवश्यक आहे.खा.महाडिक यांच्या मागणीची जलसंपदामंत्री ना.सी.आर .पाटील यांनी गांभीर्याने घेतली असून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचे संकट रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना केल्या जातील असे अभिवचन दिले आहे.