संततधार पावसामुळे चिकोडी, निपाणी तालुक्यातील शाळांना दोन दिवस सुटी

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

बेडकिहाळ : डॉ विक्रम शिंगाडे : 

संततधार पावसामुळे गुरुवार 25 व शुक्रवार 26 जुलै  असे दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण खात्याने दिलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब करुन सहा तालुक्यात सुटी जाहीर केली आहे. जिल्हा प्रशासनाने बेळगाव, खानापूरसह सहा तालुक्यातील शाळांना आणखी दोन दिवस सुटी वाढवली आहे.

बेळगाव, खानापूर, बैलहोंगल व कित्तूर या चार तालुक्यात पदवीपूर्व कॉलेजनाही सुटी जाहीर करण्यात आली आहे.

 जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी सायंकाळी यासंबंधी आदेश जारी केला आहे. बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, कित्तूर, चिकोडी व निपाणी या सहा तालुक्यात अंगणवाडी, सर्व सरकारी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post