आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून शहरातील विविध भागात पाहणी

 इचलकरंजी महानगरपालिका जनसंपर्क विभाग प्रे.नो.२४९/२४

     दि.११/०७/२०२४



          

प्रेस मीडिया लाईव्ह :

  इचलकरंजी   शहरातील विविध भागात स्वच्छता विषयक तक्रारी प्राप्त होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने आयुक्त तथा प्रशासकप ओमप्रकाश अनेक वेळा स्वतःच शहरातील विविध भागात फिरून आरोग्य विभागाच्या कामकाजाची पाहणी करत असतात.

      आज गुरुवार दि.११ जूलै रोजी आयुक्त यांनी शहरातील विविध भागात भेट दिली असता  सकाळी आठ वाजताच चहासाठी सुट्टी केलेल्या कामगारांना सक्त समज दिली.तसेच भेट दिलेल्या ठिकाणी नागरिकांशी हितगुज करून आपल्या घरातील अथवा दुकानातील कचरा घंटागाडी मध्येच देण्याबाबत सूचना दिल्या. प्रभागातील सफाई कर्मचारी बरेच दिवस गैरहजर असल्याने स्वच्छतेचे काम होत नसल्याचे नागरिकांनी सांगितल्यावर संबंधित कर्मचारी यांचे निलंबनाचे आदेश आजच काढण्याचे आदेश वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांना दिले.

  त्याच बरोबर या पुढे  सफाई कामगार, वॉर्ड इन्स्पेक्टर आणि स्वच्छता निरीक्षक यांचेसह त्या झोनमधील मुख्य स्वच्छता निरीक्षक यांचेकडून स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आलेस संबंधितांवर कठोर कारवाई करणेचा इशारा यावेळी आयुक्त यांनी दिला. यावेळी स्वच्छता निरीक्षक विजय पाटील उपस्थित होते.


      

Post a Comment

Previous Post Next Post