इचलकरंजी शहरात दि.१० ते २५ जुलै या कालावधीत "खिळे मुक्त झाड अभियान"राबविणार - आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी शहरात दि.१० ते २५ जुलै या कालावधीत "खिळे मुक्त झाड अभियान"राबविणार - आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे सध्या शहरांमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या बऱ्याच वृक्षांचा उपयोग फलक, बॅनर किंवा होर्डिंग लावण्यासाठी केला जात आहे. शहरातील बऱ्याच रस्त्यावर असलेल्या वृक्षांना खिळे ठोकून जाहिरात फलक लावलेले दिसतात. बॅनर / पोस्टर घट्ट बसावा म्हणून वृक्षाच्या बुंध्यात चारी बाजूंनी खिळे ठोकले जातात.  झाडांवर ठोकलेले खिळे कालांतराने गंजतात व तो गंज झाडांच्या बुंध्यात उतरून झाडांना इजा होऊन बहुतांश झाडे मरण पावतात. त्याचप्रमाणे झाडांच्या बुंध्यावर फलक / बॅनर/ होर्डिंग लावल्याने शहराच्या विद्रुपी करणात भर पडते. 

        तरी वरील गोष्टींचा विचार करता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात   दि. १० जुलै २०२४ ते २५ जुलै २०२४ या कालावधीत "खिळे मुक्त झाड अभियान" राबविण्यात येणार आहे. या अभियाना सोबतच रस्त्यावरील झाडांवर केलेली रोषणाई व झाडांचे वय वाढल्या नंतरही तसेच राहिलेले ट्री गार्ड सुद्धा काढण्यात येणार आहेत. 

         सदर अभियान इचलकरंजी शहरात सुद्धा राबविण्यात येणार आहे. तरी पुढील काळात ही झाडांवर कोणी खिळे मारणार नाही, फलक /बॅनर/ होर्डिंग लावू नयेत असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.


      

Post a Comment

Previous Post Next Post