मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या योजनेच्या अनुषंगाने महिला मेळावा संपन्न

 इचलकरंजी महानगरपालिका 



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी महापालिकेमार्फत गुरुवार दिनांक ४ जुलै २०२४ रोजी घोरपडे नाट्यगृह येथे  आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये महिला मेळावा घेण्यात आला.

         सदर मेळाव्यामध्ये  आयुक्त  ओमप्रकाश दिवटे यांनी इचलकरंजी शहरातील सर्व महिला बचत गटांना मार्गदर्शन केले तसेच *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण* या योजने संदर्भात सविस्तर माहिती दिली तसेच या संदर्भात काही तक्रार असल्यास महिला व बालकल्याण विभाग या ठिकाणी सुरू असणाऱ्या तक्रार निवारण केंद्रात तक्रार देण्याचे आवाहन केले.

सदर मेळाव्यात  उपायुक्त स्मृती पाटील  यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. 

    या योजनेच्या  अटी व नियमावली सर्व महिला व अंगणवाडी सेविकांना समजावून सांगितल्या तसेच त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले.  

     याशिवाय सदर मेळाव्यामध्ये पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशन या संस्थेचे हिमांशू लेले, माधवी पटवर्धन व सायली दौंडे यांनी प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच प्लास्टिक मुक्तीचे विविध उपाय सांगितले. तसेच जीवन रक्षक संस्थेचे सुधीर गोरे व राकेश नाम गावे यांनी बीज निर्मिती व वृक्षारोपण याबाबत तसेच कचऱ्यापासून खत निर्मिती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. 

       सदर कार्यक्रमास समाज विकास विभाग प्रमुख विकास विरकर, महिला बालकल्याण विभाग प्रमुख सीमा धुमाळ , आस्थापना विभाग प्रमुख प्रियांका बनसोडे, पंतप्रधान आवास योजना प्रमुख शुभांगी जोशी, दीनदयांळ योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व्यवस्थापक बाळकृष्ण व्हनखंडे, शहर समन्वयक प्रविण बोंगाळे,  रमजान नदाफ समूह संघटिका  निंबाळकर तसेच शहरातील सर्व महिला बचत गट, प्रगती शहर स्तरीय संस्था तसेच माविमच्या सहयोगिनी व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.


     

Post a Comment

Previous Post Next Post