आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून पुर परिस्थितीची पाहणी

 


  


 


प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी  गेले दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढल्याने इचलकरंजी येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत आहे. आज शनिवार दि.२० जूलै रोजी सकाळी ११ वाजता पंचगंगा नदी पाणी पातळी  ५९.०३ इतकी होती. 

  (इशारा पातळी ६८ फूट, 

   धोका पातळी ७१ फूट आहे.)

      या पार्श्वभूमीवर  आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्या समवेत पंचगंगा नदी घाट येथे भेट देऊन पुर परिस्थितीची पाहणी केली. 

   इचलकरंजी शहरातील २०१९आणि २०२१ या वर्षांच्या महापुराचा पुर्वानुभव लक्षात घेता संभाव्य पूरपरिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर आयुक्त यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह सर्वच विभाग प्रमुख तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांना सतर्क रहाणेचे आदेश दिले आहेत तसेच पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय नसोडणे च्या सक्त सूचना दिल्या. 

    यावेळी शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील यांचेसह आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

(दुपारी ४ वाजता पाणी पातळी ५९.०९ इतकी आहे.)


       

Post a Comment

Previous Post Next Post