प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण'* योजना राबविण्यात येत आहे.
आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त प्रसाद काटकर आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियंत्रणाखाली इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करणेत येत आहे.
याकरिता पहिल्या टप्प्यात श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे दि.१५ जूलै आणि दि.१६ जूलै रोजी विशेष शिबीराचे आयोजन करणेत आले होते.या शिबिराचा शहरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात
महानगरपालिका मुख्य कार्यालय,
४ विभागीय कार्यालयासह शहरातील खालील विविध ठिकाणी या योजनेचे अर्ज स्विकारण्याची सुविधा महानगरपालिका प्रशासना
कडून उपलब्ध करून देणेत येत आहे.
१) महानगरपालिका मुख्य कार्यालय
२) प्रभाग समिती कार्यालय अ
३) प्रभाग समिती कार्यालय ब
४) प्रभाग समिती कार्यालय क
५) प्रभाग समिती कार्यालय ड
६) साईट नं. १०२, मलाबादे विद्या मंदिर
७) बाबुराव आवाडे विद्या मंदिर
वंदे मातरम मैदानसमोर
८) राजाराम स्टेडीयम, काँग्रेस कमिटीसमोर
९) लालबहादूर शास्त्री विद्या मंदिर
१०) कलानगर शाळा, हजेरीचे ठिकाण
११) आण्णा रामगोंडा शाळा, हजेरी ठिकाण
१२) विठ्ठल रामजी शिंदे विद्या मंदिर, शाहू पुतळा
१३) यशवंत कॉलनी दत्त मंदिरजवळ, बालवाडी
१४) महात्मा गांधी सोसायटी समाजमंदिर
१५) स्टेशन रोड नाका, अग्निशमन दलाजवळ
१६) मणेरे हायस्कूल
१७) हेडगेवार विद्या मंदिर, गणेशनगर
१८) सोलगे मळा
१९) सरस्वती हायस्कूल, भोणे माळ
२०) भगतसिंग जलतरण तलावजवळ
२१) तांबे माळ शाळा, पाण्याची टाकी
२२) बौद्ध समाज मंदिर, शहापूर
२३) राणी लक्ष्मीबाई विद्या मंदिर
२४) बौद्ध विहार, टाकवडे वेस
२५) महासत्ता चौक, स्वामी समर्थ मंदिर
२६) मरगुबाई मंदिर, नदी वेस
२७) गेस्ट हाऊस, विठ्ठल मंदिर समोर
२८) विकली मार्केट गाळा
२९) शाळा क्र. ६, खंजिरे मळा
३०) न.प. शाळा, थोरात चौक, शांतीनगर
३१) लालनगर आरोग्य केंद्र
या ठिकाणी शहरातील महिलांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरुन घेणेत येणार आहेत.
सदर योजनेसाठी खालील
कागदपत्रे आवश्यक आहेत.
१) आधारकार्ड (अर्जामध्ये आधारकार्ड वरील नाव नमुद करावे)
२. अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड / १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळख पत्र, जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला / अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.
४. वार्षिक उत्पन्न रु.२.५० कमी असणे आवश्यक,
अ) पिवळी अथवा केशरी
शिधापत्रिका असल्यास
उत्पन्न प्रमाणपत्राची
आवश्यकता नाही.
ब) शुभ्र शिधापत्रिका
असल्यास अथवा
कोणती सुद्धा पत्रिका
नसल्यास वार्षिक उत्पन्न
रु. २.५ असल्याचे
प्रमाणपत्र आवश्यक.
५. अर्जदाराचे हमीपत्र
६. बँक खाते तपशील (आधार लिंक असलेले)
७. अर्जदाराचा फोटो ( लाभार्थी महिलेचा)
तरी शहरातील पात्र महिलांनी जास्तीत जास्त संख्येने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.