प्रबोधिनीत रविवारी अर्थसंकल्पावर चर्चासत्र

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी :  समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने  ' केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ ' या विषयावर जाहीर चर्चासत्राचे आयोजन  करण्यात आले आहे.या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान जेष्ठ अर्थतज्ञ व शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. व्ही.बी.ककडे भूषविणार आहेत. तर या चर्चासत्रात जेष्ठ अर्थतज्ञ प्रो.डॉ.त्रिशला कदम ,सुनील नागावकर (C.A) आणि अनिल पाटील हे मांडणी करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर दरवर्षी समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने जाहीर चर्चासत्राचे आयोजन केले जाते. या अर्थसंकल्पीय चर्चासत्राचे हे ४७ वे वर्षे आहे. हे चर्चासत्र रविवार ता.२८ जुलै २०२४ रोजी सायं. ६ वाजता समाजवादी प्रबोधिनी च्या सभागृहात होणार आहे. तरी जिज्ञासू बंधू-भगिनींनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post