प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : अरुण विद्या प्रसारक मंडळचे अरुण विद्या मंदिर संग्राम बालवाडी मध्ये आषाढी एकादशीनिमित्त शाळा स्तरावर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.* *महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभलेली आहे. त्यानिमीत्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींचे पूजन, तुळशी पूजन करून सोहळयाची सुरवात मा.नगरसेवक राजवर्धन नाईक सरकार ,संस्था सेक्रेटरी उद्योजक संग्राम स्वामी उमाकांत दाभोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
*शाळेच्या मुख्याध्यापक संजय कोळी व सामाजिक कार्यकर्ते* *पै तानाजी भोसले*, *डॉ कार्तिक स्वामी अरुण बंडगर अर्जुन तरंगे, राजू तोडकर,माजी* *मुख्याध्यापक रामचंद्र गुरव*
यांनी दीपप्रज्वलन केले* *विठूरायाची आरती गायन सर्व शिक्षकांनी केले. यावेळी प्रशांत गुरव गुरुजी व यांनी* *एकादशीची सुरवात केव्हा व कशी झाली आणि उपवास का केला जातो, याविषयी माहिती दिली. तर अरुणा खैरमोडे मॅडम यांनी आपल्या मधुर वाणीने अभंग व गवळणीची गायन केले व* *त्यांना अरुणा बंडगर, लता सांळुखे, शिल्पा बंडगर,स्नेहा शिंदे, राणी मॅडम आणि विशाल चोरगे नृत्य दिग्दर्शक यांनी साथ दिली.
शेवटी प्रासादिक अभंगांचे गायन करून अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या व मान्यवर हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले योगेश वाघमारे नंदकुमार लोखंडे विश्वनाथ मेटे शाहीर जगताप दुर्गा माता महिला भजनी मंडळ सदस्य उपस्थित होते यावेळी विठूनामाच्या गजरात विद्यार्थी सर्व शिक्षकांनी फेरा धरला, फुगडी खेळली त्याचबरोबर पालखी नाचवली अशा पध्दतीने शाळेतच पंढरपूर अवतरल्याचा अनुभव सर्वांना घेतला. या पारंपरिक सोहळ्याचे सूत्रसंचालन असीफ वाटे गुरुजी यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार प्रवीण नाईक गुरुजी यांनी मानले.
-