गंभीर पुर परिस्थितीमध्ये सुद्धा इचलकरंजी शहरवासी यांना नियमितपणे पाणीपुरवठा करणे साठी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी कार्यरत

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी शहरास कृष्णा नदी मजरेवाडी येथुन आणि पंचगंगा नदी मधून पाणी पुरवठा करणेत येतो. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने सध्या पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांना पूर आलेला आहे.

       कृष्णा नदीच्या पुरामुळे मजरेवाडी येथील पाणी पुरवठा योजनेच्या पाणी उपसा केंद्रास पुराचा वेढा पडलेला आहे. तसेच पंचगंगा नदीच्या पुरामुळे पंचगंगा पाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेलला सुद्धा पुराचा वेढा पडलेला आहे.

या गंभीर पुर परिस्थितीमध्ये सुद्धा शहरवासीयांना नियमितपणे पाणी पुरवठा व्हावा यासाठी  महानगर पालिका पाणीपुरवठा विभागाचे पंचगंगा जॅकवेल येथे अमर गेजगे, संदीप दाशाळ,ओम यादव, नवमान किल्लेदार आणि मजरेवाडी येथे संदेश सूर्यवंशी, शुभम धुमाळ, विठल माने, यशोदीप इचलकरंजीकर,श्रीधर मगदूम  विनायक आवळे हे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्यरत आहेत.

     या पुर परिस्थितीमध्ये सदर कर्मचारी पुर्णवेळ तिथेच राहतातआणि तिथेच जेवण करतात.त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना जेवणाचे तसेच इतर जीवनावश्यक साहित्य, अत्यावश्यक औषधे पोहचविण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी दिले होते.

   या आदेशानुसार कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, पर्यावरण अधिकारी अभय शिरोलीकर, अभियंता बाजी कांबळे,माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे यांनी कुरुंदवाड येथुन कृष्णा नदी पुरातील पाण्यातुन बोटिने जावुन त्याठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्य पोहचविले.


      

Post a Comment

Previous Post Next Post