प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : मागील आठवड्यात इचलकरंजी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पंचगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी इचलकरंजी शहरातील नागरी वस्ती मध्ये आले आहे. इचलकरंजी शहरात पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडलेली असुन सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ७२.०६ इतकी झालेली आहे.गेले दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झालेने पाणी पातळी काही प्रमाणात स्थिर आहे. परंतु नागरी वस्तीमध्ये पुराचे पाणी आहे त्या अवस्थेतच आहे.
या अनुषंगाने आज सोमवार दि.२९ जूलै रोजी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी उपायुक्त प्रसाद काटकर आणि सोमनाथ आढाव यांच्या समवेत शहरातील पि.बा.पाटील मळा, टाकवडे रोड तसेच नदी परीसरातील पुराची पाहणी करून सदर ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना सतर्क रहाणेच्या सुचना दिल्या.
त्याचबरोबर शहरातील पुरग्रस्त छावणीमध्ये भेट देऊन पाहणी केली आणि पुरग्रस्त नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेणेच्या सुचना सर्व छावणी प्रमुख यांना दिल्या.
यावेळी माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील,वरद विनायक बोट क्लबचे गणेश बरगाले, प्रभारी स्वच्छता निरीक्षक उमेश कांबळे, तानाजी कांबळे, अमोल कांबळे आदी उपस्थित होते.