इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात ' मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना प्रभावीपणे राबविणार ‌‌ आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

  इचलकरंजी :  राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात *' मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण'* योजना राबविण्यात येत आहे.

     आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात या योजनेची  अंमलबजावणी प्रभावीपणे करणेत येणार आहे.

  याकरिता श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे सोमवार दि.१५ जूलै आणि मंगळवार दि.१६ जूलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विशेष शिबीराचे आयोजन करणेत आले आहे.

          या ठिकाणी शहरातील महिलांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरुन घेणेत येणार आहेत. तसेच बचत गटांच्या महिलांच्या मार्फत पर्यावरण पूरक वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉलचे आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे.

   सदर योजनेसाठी खालील  कागदपत्रे आवश्यक आहेत.

  

  १) आधारकार्ड (अर्जामध्ये आधारकार्ड वरील नाव नमुद करावे)

२. अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.

३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड / १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळख पत्र, जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला / अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.


४. वार्षिक उत्पन्न रु.२.५० कमी  असणे आवश्यक, 

      अ) पिवळी अथवा केशरी 

           शिधापत्रिका असल्यास 

           उत्पन्न प्रमाणपत्राची

          आवश्यकता नाही.

       ब) शुभ्र शिधापत्रिका 

           असल्यास अथवा  

           कोणती सुद्धा पत्रिका 

           नसल्यास वार्षिक उत्पन्न

           रु. २.५ असल्याचे 

           प्रमाणपत्र आवश्यक.


५. अर्जदाराचे हमीपत्र


६. बँक खाते तपशील (आधार लिंक असलेले)


७. अर्जदाराचा फोटो ( लाभार्थी महिलेचा)


           तरी शहरातील पात्र महिलांनी जास्तीत जास्त संख्येने 

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.


    

Post a Comment

Previous Post Next Post