प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : जामा सोशल फाउंडेशन इचलकरंजी यांच्यावतीने राजकीय, सहकारी, सामाजिक व शैक्षणिक विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अशपाक गवंडी यांनी केले व असलम शेख यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली व जामा सोशल फाउंडेशन च्या कार्याचा आढावा सांगितला.
सत्कारमूर्ती सामाजिक कार्यकर्ते हाजी युसुफ तासगावे यांनी आधार संस्था, अनिस संघटना, इचलकरंजी मुस्लिम कोर कमिटी, इचलकरंजी छोटे व्यापारी संघटना यामधून सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा मांडला व सर्वांना या कार्यामध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले.* तसेच सत्कारमूर्ती डॉक्टर श्री अरुण कुलकर्णी अब्दुल लाट यांनी गेली 40 वर्ष समाजातील गरीब व गरजूंना मोफत व अल्प दरात वैद्यकीय सेवा पुरवत असल्याचे सांगितले त्याचबरोबर शैक्षणिक कार्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. याबरोबर माननीय श्री डॉक्टर अरुण कुलकर्णी, डॉक्टर अर्षद बोरगावे, अब्दुल कलाम अकॅडमीचे श्री खोडे सर ,जवाहार बेकर्स सलीम मोमीन या सर्वांना सामाजिक कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.
यावेळी जामा सोशल फाउंडेशनचे असलम शेख, अशपाक गवंडी, रफिक बागवान ,अलनसीर शेख, वाहिद पटवेगार ,शकील रमदान ,शब्बीर शेख ,मुजीब तराळ, निसार पटवेगार, दस्तगीर कोतवाल व इतर मान्यवर उपस्थित होते