बांबू शेती अभ्यासक पाटलोबा पाटील यांचा सन्मान


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी - कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रसिद्ध बांबू शेती अभ्यासक पाटलोबा पाटील यांना रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी हेरिटेज यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

क्लबचे अध्यक्ष ओंकार हरीदास, सेक्रेटरी विशाल कोथळे, ट्रेझरर अमोल शहा यांच्या हस्ते कृषी दिनाचे औचित्य साधत बांबू शेतीमधील अभ्यास, त्या संदर्भातील प्रचार व प्रसार या कार्यालबद्दल पाटलोबा पाटील यांचा सन्मान करण्यात आला. पर्यावरण रक्षणासाठी बांबू शेतीची गरज याचा प्रसार समाज माध्यमातून करण्याचे कार्य पाटलोबा पाटील करत आहेत. त्यांनी बांबूविषयी तयार केलेले व्हिडिओ देशभर पाहिले जातात. पाटलोबा पाटील हे प्रसिद्ध कवीही आहेत. याप्रसंगी सौ. सरोजनी पाटील, चित्रकार सर्वेश्‍वर पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post