प्रेस मीडिया लाईव्ह :
हेरले प्रतिनिधी / संदीप कोले
विशाळगड व गजापूर गावामध्ये मज्जिद व मुस्लिम लोकांच्या वर हल्ला, व त्यांच्या घरावर दुकानावर भ्याड हल्ला केला या हल्ल्यामध्ये स्थानिक मुस्लिम लोक गंभीरित्या जखमी झालेले आहेत त्याचप्रमाणे त्यांचे न भरून येणारे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे हे कृत्य अत्यंत निंदनीय व बेकायदेशीर आहे .
अशा कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. व झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने नायब तहसीलदार चव्हाण साहेब यांना निवेदन देण्यात आले. व मुस्लिम समाजाच्या वतीने गाव बंद करून शांतता राखावी.व कोणत्याही कृत्य करू नये व कोणतेही व्हिडिओ व्हायरल करून कायदा सुव्यवस्था बिघडू नये अशा सूचना माजी सरपंच बालेचाँद जमादार यांनी दिल्या.
त्यावेळी हातकणंगले नायब तहसीलदार चव्हाण साहेब मंडल अधिकारी बेळणगेकर मॅडम, तलाठी व्ही एस चांदणे, हातकणंगले पोलीस निरीक्षक सायकर साहेब, कोतवाल मोहम्मद जमादार, माजी सरपंच बालेचाँद जमादार मुनीर जमादार, रियाज जमादार, अश्फाक देसाई, अमीन बारगीर, इब्राहिम खतीब, इमरान खतीब व झालेल्या घटनेच्या निषेध व्यक्त करण्यासाठी कामधेनु चेअरमन आदगोंडा पाटील, माजी सभापती हातकणंगले राजेश पाटील, दादासो काशीद तसेच वंचित बहुजन आघाडी शाखा हेरले च्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. त्यावेळी गावातील मुस्लिम बांधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.