प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- लक्षतिर्थ येथे यशोदा विश्वास कॉलनीत रहात असलेल्या आज्ञा प्रशांत गायकवाड (वय 26.रा.यशोदा विश्वास कॉलनी, लक्षतिर्थ वसाहत) यांनी बुधवार दि.17/07/2024 रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास राहत्या घरात छताच्या हुकाला ओढ़णीने गळफास लावून घेतल्याने त्याना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी 108 ॲम्बुलन्सने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची फिर्याद प्रशांत गायकवाड यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली असून या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे
अधिक माहिती अशी की ,यातील मयत याचे दहा महिन्यापूर्वी प्रशांत यांच्याशी विवाह झाला होता.प्रशांत यांचे मुळगाव कर्नाटकातील असून ते नोकरी निमीत्त कोल्हापुरात रहात असून ते एका बँकेत नोकरीस आहेत.यातील मयत या मुळच्या नाशिक आहेत.पती सकाळी नोकरीस गेल्या नंतर हा प्रकार घडल्याचे समजते.या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
घटना स्थळी शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी भेट देऊन मयताच्या नातेवाईकांची विचारपूस करून माहिती घेतली.मयताच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.