प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हयातील वळकी येथे रहात असलेल्या श्रावणी श्रीकांत गोरे (वय )यानी गुरुवार दि.11/07/2024 रोजी रात्री साडे आठच्या सुमारास "इनफिल्ड़" नावाचे औषध घेतल्याने मंगळवार दि.15/07/2024 रोजी रात्रीच्या सुमारास उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार चालू असताना बुधवार दि.17/07/2024 रोजी सकाळी दहाच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,यातील मयत वळकी (रत्नागिरी) येथे रहात असून काही दिवसांपूर्वी त्यांचे चुलत सासरे वारले होते.11 जुलै रोजी पती पत्नी त्यांच्या शेतात भात रोपण साठी गेले होते त्यांचे पती शेतात लवकर घरी आले तर मयत दुपारच्या सुमारास घरी आल्या असता त्यांना एवढ़ा वेळ का म्हटल्याने त्या मोठ्याने बोलत असताना थोडे हळू बोल म्हटल्यावर त्या आतील खोलीत जाऊन विषारी औषध घेतल्याचे त्यांच्या पतीने सांगितले.त्या वेळी उलट्या करीत असताना रिक्षातून उपचारासाठी प्रथम पाली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून तेथून पुढ़ील उपचार रत्नागिरी येथे शासकीय रुग्णालयात दाखल करून पुढ़ील उपचार 15/07/2024 रोजी दाखल केले असता त्यांचा 17/07/24 रोजी मृत्यु झाला.