स्थानिक गुन्हे अन्वेषन पथकाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- जैताळ येथे स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या पथकाने कारवाई करून गावठी पिस्तुल व एका काडतुसासह दुचाकी जप्त करून एक लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त करून चौघांना अटक केली आहे.या प्रकरणी अक्षय सचिन सुतार (वय20.रा.आपटेनगर) अजिंक्य अनिल सुतार(वय22.रा.म्हसवे,भुदरगड) या दोघांना अटक करून त्यांच्या कडील पिस्तुल जप्त करण्यात आला आहे.
या बाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता हे पिस्तुल आणि काडतुस आपल्याला विक्री करण्यासाठी पवन धोडिंराम कांबळे (वय 27.रा.आपटेनगर ) यांनी दिल्याचे सांगितले .आणि पवन कांबळे यांने हे पिस्तुल ऋतुराज इंगळे यांच्या कडुन घेतले असून ऋतुराज यांने अमोल सुरेश खंदारे (वय28,सुर्वेनगर) याच्या कडुन घेतल्या माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील एक पिस्तुल ,जिवंत काडतुसासह दुचाकी जप्त करून त्या चौघांना अटक करून इस्पुर्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई करण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषन पथकाला दिल्या होत्या.त्या नुसार याची माहिती घेत असताना जैताळ येथे हॉटेल सासुरवाडी परिसरात दोघे जण पिस्तुल विक्री साठी येणार असल्याची माहिती या पथकातील पोलिसांना मिळाली असता त्यांनी त्या परिसरात सापळा रचून या चौघांना ताब्यात घेऊन कारवाई केली.या चौघांवर बेकायदेशीर विना परवाना हत्यार बाळगून विक्री करण्याचा प्रयत्न केल्याने हत्यार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ,शाहुपुरी पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक संदिप जाधव ,पोलिस विनोद चौगुले,संजय पडवळ ,यशवंत कुंभार ,राहुल मर्दाने आणि विनोद कांबळे यांनी केली.