स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- करवीर तालुक्यातील कणेरीवाडीतील साईनगर , कंजारभाट वसाहत येथे गावटी हातभट्टीची दारु तयार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्या नुसार पोलिसांनी शुक्रवार दि.05/07/2024 पहाटेच्या सुमारास छापा टाकून गावटी हातभट्टीची दारु तयार होत असलेल्या दहा ठिकाणी छापा टाकून नष्ट केल्या
दारु तयार करण्यासाठी लागणारे 5,400 लि.कच्चे रसायन,500 लि.पक्के रसायन आणि 200 लि.तयार दारु व इतर साहित्य असा सर्व मिळुन 2 लाख 17 हजार 180 रु.किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला.
या प्रकरणी रोहित दिपक घांरुगे ,सनी सरवर बाटुंगे ,अर्जुन रमेश घारुंगे ,संदिप दिपक घारुंगे ,जगदिश सुरेश बाटुंगे , आणि राकेश सुरेश बाटुंगे (सर्व रा.साईनगर ,कंजारभाट वसाहत कणेरीवाडी )यांच्यासह चार महिलांच्याचर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर पोलिस उपनिरीक्षक संदिप जाधव ,पोलिस खंडेराव कोळी,संजय हुबे ,संजय पडवळ,सारीका मोटे यांच्यासह गोकुळशिरगाव पोलिसांनी मिळून केली .