प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - राधानगरी परिसरात असलेल्या काळम्मावाडी धरण पाहण्यासाठी आलेले दोन प्रर्यटक वाहून गेल्याचे समजते.ही घटना सोमवार दि.01/07/2024 रोजी दुपारच्या सुमारास काळम्मावाडी धरण क्षेत्रात घडली आहे.यात गणेश चंद्रकांत कदम (वय 18) आणि प्रतिक पाटील (वय 22.रा दोघे .निपाणी ) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.घटना स्थळी राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गोरे हे आपल्या कर्मचारी यांच्यासह घटना स्थळी दाखल झाले असून ते रेस्क्यु फोर्सच्या मदतीने वाहून गेलेल्यां दोघांचा शोध घेत आहेत.
कर्नाटकातील निपाणी येथील हे प्रर्यटक असून 13 जण काळम्मावाडी धरण पहाण्यास आल्याचे समजते.