प्रेस मीडिया लाईव्ह :
बेडकिहाळ प्रतिनिधी : डॉ विक्रम शिंगाडे
गेल्या चार-पाच दिवसांपासून संततधार असण्ाया पावसाचा काहीसा जोर वाढल्याचे दशनिपाणी तालुक्यातील वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत अधिकच वाढ होत आहे. शनिवारी प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांनी तहसीलदार एम एन बळीगार यांच्यासह दूधगंगा व वेदगंगा नदीकाठची पाहणी केली. बेडकिहाळ, कारदगा आणि यमगर्णी येथे पाहणी केली. यावेळी नद्यांची पाणीपातळी वाढल्याने संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याची आदेश तालुका प्रशासनाला दिले.
आतापर्यंत काळम्मावाडी ५२ टक्के तर पाटगाव धरण ८२ टक्के भरले आहे. काळम्मावाडीचा पाणीसाठा ६५ टक्यांच्या पुढे गेल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन आहे तर पाटगाव धरणातून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वेदगंगा आणि दूधगंगा या दोन्ही नद्यांमध्ये एकत्रितपणे ४० हजार क्युसेक इतकी पाण्याची आवक झाल्यास पूरस्थिती निर्माण होते.