(भारतीय डाक विभागाचा नाविन्यपूर्ण तसेच पर्यावरण पुरक प्रयोग)
प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद : पोस्टमास्टर जनरल कार्यालय छावणी अंतर्गत टपाल वितरण करण्यासाठी प्रयोगीक तत्वावर इलेकट्रीक सायकल चे उदघाटन महाराष्ट्र सर्कल चे चीफ पोस्ट मास्टर जनरल श्री किशन कुमार शर्मा तसेच छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल श्री अदनान अहमद यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
सध्याच्या पारंपरिक टपाल वितरनाच्या पद्धतीमध्ये बदल होऊन पोस्टमन दादा ला आता इलेक्ट्रिक सायकल वर स्वार होऊन जलद टपाल वितरण करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. दाट लोकवस्ती असलेल्या वस्त्या, कॉलोनी येथे या इलेक्ट्रिक सायकल च्या माध्यमातून जलद टपाल वितरण करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. नागरिकांना सुद्धा यामुळे जलद टपाल मिळण्यास मदत होईल. या इलेक्ट्रिक सायकल च्या माध्यमातून पर्यावरण पूरक तसेच नवीन बदलांचा जलद स्वीकार टपाल विभागाने केलेला दिसून येतो. या इलेक्ट्रिक सायकल मुळे पोस्टमन दादा सुद्धा खूप खुश झाल्याचे दिसून आले. सर्व डाक विभागाच्या अधिकारी व कर्मचारीवर्गाने या उपक्रमाचे आनंदाने जोरदार स्वागत केले.
यावेळी बोलताना चीफ पोस्टमास्तर जनरल श्री किशनकुमार शर्मा यांनी सर्व कर्मचाऱ्यांना डाक विभागाच्या सर्व सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्यासाठी तत्पर राहण्याचे तसेच जलद आणि तत्पर सेवेतून डाक सेवा हीच जनसेवा या ब्रीद वाक्याला कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला श्री असादुल्लाह शेख, सह निदेशक डाक सेवा छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, श्री. मासूम पटेल, सहा अधीक्षक डाकघर , तसेच डाक विभागाचे इतर कर्मचारी हजर होते.