वर्तमानपत्रांचे मागील तीन वर्षापासूनचे जाहिरात देयक काढा - अब्दुल कय्यूम

 आठ दिवसाच्या आत सर्व बिले काढावे नसता आम्ही मनपा समोर अमर उपोषण करणार.

प्रेस मीडिया लाईव्ह :

छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद : 

 आज व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग तर्फे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांना वर्तमानपत्रांचे थकीत बिले त्यावरील काढण्याचे आदेश द्यावे यासाठी आज अब्दुल कय्यूम यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलेले आहे.

मागील तीन वर्षापासून वर्तमानपत्राचे प्रलंबित देयके असलेल्या महानगरपालिकाने त्यावरील काढावे नसता आम्ही महानगरपालिका समोर आमरण उपोषण करणार आहोत.याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी असे यावेळी अब्दुल कयूम यांनी सांगितलेले आहे.

सन २०२२/२०२३/२०२४ चे महानगरपालिका जाहिरातींचे देयक लेखा विभागात पास होऊन प्रलंबित आहे. याबाबत मनपा आयुक्ताशी चर्चा करूनही तसेच अनेक वेळा लेखी स्वरुपात पत्रव्यवहार करूनही फक्त आश्वासन मिळाले आहेत. प्रलंबित देयक आजपर्यंत लेखा विभागात जसेच्या तसेच पडले आहे. पत्राकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही.  वर्तमानपत्राचे संपादक व पत्रकार वारंवार लेखा विभागात चकरा मारून काहीच उपयोग होत नाही. मुख्य लेखाधिकारी यांना भेटल्यास सध्या बजट नाही, बजट आल्यावर देयक देण्यात येईल. मागील दोन वर्षापासून लेखा विभागातून अशा प्रकारचे उत्तर दिले जात आहे. आज वृत्तपत्र छपाईसाठी लागणारे साहित्य, कर्मचार्‍यांचे पगार हे जाहिरातीच्या देयकावर अवलंबून आहे. आमची प्रशासनाला चेतावणी आहे.की लेखा विभागात प्रलंबित असलेली देयक येत्या आठ दिवसाच्या आत काढावे नसता आम्ही व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे सर्व मालक, संपादक महानगरपालिका कार्यालयासमोर  आमरण उपोषण  करणार आहोत.तरी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांतजी आपण याबाबत विचार करून लेखा विभागाला प्रलंबित देयके तात्काळ अदा करण्याचे आदेश द्यावेत. मालक, संपादकांना अमर उपोषणास बसण्याची वेळ येऊ देऊ नका. असे यावेळी सांगितल्यात आलेल्या आहेत.

यावेळी मराठवाडा अध्यक्ष साप्ताहिक विंग अब्दुल कयूम, अब्दुल गनी,बबन सोनवणे,सुरेश शिरसागर, मिर्झा शफीक बेग,सय्यद शब्बीर, तोफिक शेहबाज,सय्यद नदीम आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post