आटपाडीच्या अनिता पाटील भविष्यातल्या आमदार, नामदार !

सौ . राबीयाँबसरी व सादिक खाटीक यांचे गौरवोदगार

प्रेस मीडिया लाईव्ह :

आटपाडी  : 

             आटपाडीच्या अभियंता सौ .अनिता विजयराव पाटील या भविष्यातल्या आमदार, नामदार होण्याची पात्रता असणाऱ्या लक्षवेधी, धाडशी, जिगरबाज आणि सकारात्मक उर्जेचे भांडार असणाऱ्या तरुण महिला नेत्या आहेत, असे गौरवोदगार आटपाडी ग्रामपंचायतीच्या शिक्षण, पाणीपुरवठा समितीच्या माजी उपाध्यक्षा सौ . राबीयाँबसरी सादिक खाटीक आणि सादिक खाटीक या दांम्पत्याने काढले .

                गत महिन्यापूर्वी अचानक आजारी पडलेल्या आणि मोठ्या गंभीर आजारावर यशस्वी मात करून पूर्ववत कार्यरत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला विभागाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षा अभियंता सौ . अनिता पाटील यांचा त्यांचे निवासस्थानी जावून सौ . राबीयाँबसरी सादिक खाटीक यांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ घालून सन्मान करीत त्यांना सदिच्छा शुभेच्छा, आशीर्वाद, दुवाँ दिल्या .

                यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष तथा कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक, सौ. अनिता पाटील यांचे अभियंता पती श्री . विजयराव पाटील, ग्रामविकास अधिकारी संजय कर्णे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शीतल कर्णे, कु . श्रीमयी कर्णे, सौ. अनिता पाटील यांचे बंधू आणि मातोश्री अनुक्रमे समाधान पाटील, श्रीमती शोभाताई पाटील या उपस्थित होत्या.

                समाजातल्या सर्व स्तरातल्या माता, भगिनी, युवती, विद्यार्थीनी इत्यादी अनेक समाज घटकांसाठी अनिता पाटील यांनी केलेले निःस्पृह कार्यच त्यांना या जीवघेण्या आजारातून बाहेर येण्यास आशीर्वाद रुपाने उपयोगी आले . आटपाडी तालुक्याची ही सदैव तळपणारी रणरागीणी भविष्यातही प्रचंड क्षमतेने कार्यरत होणार आहे. त्यांच्यात ठासून भरलेली सकारात्मक उर्जा , सर्वांप्रति असणारी आपुलकी, श्रध्दा आणि कष्ट करण्याची, झुंजण्याची असलेली वृत्ती त्यांच्या कर्तृत्वाला अधिकाधिक बळकट करते . पुरुषांसारखे सतत संघर्ष करणाऱ्या या लढाऊ महिला नेत्याची माणदेशी आटपाडी तालुका, सांगली जिल्ह्याला मोठी गरज आहे . भविष्यात अनिता पाटील हे देशभर गाजणारे मोठे नाव असेल, असेही भाकीत सौ . राबियाँबसरी आणि सादिक खाटीक या दांम्पत्याने यावेळी व्यक्त केले .

Post a Comment

Previous Post Next Post