यातील चौघांना अटक .दोन दिवसांची पोलिस कोठडी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - जादा लाभ देण्याचे आमिष दाखवून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक केल्या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी सहा संशयीता पैकी चौघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.या अटक केलेल्यात सयाजी जिन्नापा भोसले ,सुभाष जिन्नापा भोसले व रोहन जिन्नापा भोसले (सर्व रा.वळीवडे ) आणि वाकरे येथे रहात असलेला सुभाष शिवाजी कांबळे यांचा समावेश असून यातील मुख्य संशयीत शिवाजी कांबळे आणि आकाश कांबळे (रा.वाकरे) या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.या बाबतची तक्रार रविंद्र यशंवत कामत (रा.लक्षतीर्थ वसाहत परिसर , कोल्हापूर ) यांनी गांधीनगर पोलिसांत दिली असून पोलिसांनी वरील सहा जणांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की ,संशयीत सहा जणांनी तक्रारदाराला आम्ही शेअर मार्केटिंग करत असून आमची उचगाव येथे ब्राइट बुल नावाची इंन्व्हेसमेट कंपनी आहे.या कंपनीच्या माध्यमातून ट्रेनिंगसाठी आलेल्याना अधिक नफा होत असल्याचे सांगून त्यांना इतर लाभही मिळाल्याचे तक्रारदाराला सांगितले.यातील तक्रारदाराला संशयीतानी महिन्याला पाच ते सहा टक्के लाभ देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.यात तक्रारदारसह त्यांची पत्नी आणि इतर तिघांनी मिळुन सव्वा कोटी रुपयांची गुंतवणूक केली.या कंपनीने गुंतवणूकदारांना परतावा आणि गुंतवणूक केलेली रक्कम दिली नसल्याने या बाबतीत सहा जणांच्याकडे रक्कम परत मागितली असता त्यानी टाळाटाळ करत वेळ मारून नेऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता कामत यांनी या कंपनीच्या सहा जणांच्या विरोधात गांधींनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.गांधीनगर पोलिसांनी या सहा जणांच्यावर गुन्हा दाखल करून यातील चौघांना अटक केली.
या गुन्हयांचा तपास गांधीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के हे करीत आहेत.