प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -हातकणंगले तालुक्यातील वाठार येथे रहात असलेल्या आयेशा सलमान पटेल (वय 26) यांना शनिवार दि.23/06/2024 रोजी पहाटे चारच्या सुमारास रहाते घरात झालेल्या मारहाणीत त्यांना बेशुध्दावस्थेत त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी 108 अय्म्बुलन्सने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना बुधवार दि.26/06/2024 रोजी सकाळी 9 च्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
--------------------------------------
विषारी औषध घेतलेल्या तरुणाचा मृत्यु.
कोल्हापूर -शाहुवाडी तालुक्यातील सोनवडे येथील मानसिंग शामराव पाटील (वय 27) याने शनिवार दि.23/06/2024 साडे नऊच्या सुमारास रहात्या घरात विषारी औषध घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी प्रथम बांबवडे येथे स्वस्तिक हॉस्पिटल मध्ये उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना बुधवार दि.26/06/2024 रोजी साडे सहाच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
--------------------------------------
बारा वर्षाच्या मुलीचा पडुन जखमी झाल्याने मृत्यु.
कोल्हापूर -बोंद्रेनगर परिसरात असलेल्या बोगम पार्कातील समीक्षा गंगाराम घुरके (वय 12) हिचा बुधवार दि.23/06/2024 रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास फुलेवाडी येथील गुरुदेव शाळेजवळ पडुन जखमी झाल्याने प्रथम उपचार डॉ.सांळुखे येथे घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार चालू असताना बुधवार दि.26/06/2024 रोजी रात्री तीनच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.