ड्रग्ज पार्टी प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाने हॉटेल मॅनेजरसह पाच जणांना ताब्यात घेतले


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : एफसी रोडवरील लिक्वीड लीजर लाउंज हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी झाल्याचा व्हीडीओ समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. हा व्हीडीओ समोर येताच पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली.या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाने हॉटेल मॅनेजरसह पाच जणांना ताब्यात घेतले असून हॉटेल सील करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या घटनेनंतर पुण्यासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने, तसेच सहायक निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.

 याप्रकरणी पोलिसांनी पब मालका सह चालकांना ताब्यात घेतले असून, रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्याचे आदेश परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिले. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस, उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिकेने कल्याणीनगरसह शहरातील विविध भागांत असलेल्या पबवर कारवाईचा बडगा उगारला आहे .

.

Post a Comment

Previous Post Next Post