सोशल मिडीयावर अश्लिल व्हिडोओ तयार करून व्हायरल केलेल्यांचा शोध सुरू.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - सोशल मिडीयावर काही प्रेमीयुगुलानी अश्लिल व्हिडीओ तयार करून तो व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली.रविवारी शाहुपुरी पोलिसांनी दिवसभर अनेकांची चौकशी केली.पण संशयीत सापडले नाहीत.यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी रात्री उशिरापर्यंत शाहुपुरी पोलिस ठाण्यात चालू होती.

शहरात काही तरुणाच्या मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाला होता .इंन्साट्राग्रामवर प्रेमीयुगुलांचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा व्हिडीओ कोणी व्हायरल केला त्याचा पोलिस शोध घेत आहेत.आज दिवसभर शहरात याचीच चर्चा होती.दरम्यान क.बावडा येथे रील्स स्टार आहे याचीही पोलिसांनी चौकशी केल्याचे समजते. शाहुपुरी पोलिसांनी काही तरुणांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडे चौकशी करत एका संशयीताकडे चौकशी केली असता त्याने माझा मोबाईल दिड वर्षापूर्वी चोरीस गेला असून त्याचा डाटा रिकव्हर करून हा व्हिडीओ व्हायरल केल्याची शक्यता असल्याचे सांगितले.शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर   शोध घेण्याच्या पोलिसांना सूचना दिल्या .रात्री अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते .

Post a Comment

Previous Post Next Post