शाहुपुरी 3 गल्ली येथे विचित्र अपघातात चौघेजण किरकोळ जखमी

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर - शाहुपुरी 3 री गल्लीत असलेल्या एका हॉस्पिटलच्या दारात शनिवारी दि.15 /06/2024 रात्रीच्या सुमारास  रिक्षा आणि दुचाकीचा विचित्र अपघातात चौघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने या अपघाताची चर्चेला उधाण आले आहे.या अपघाताची नोंद पोलिसांत झाली नसल्याचे समजते.

अधिक माहिती अशी की, शाहुपुरी 3 गल्ली येथे असलेल्या हॉस्पिटलमध्ये रिक्षा चालकाने एका पेंशटला सोडून रिक्षा चालक वळसा घालुन जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्याने रिक्षास पुढ़च्या बाजूस धडक दिल्याने या धडकेत दोघेही खाली पडले.दरम्यान रिक्षाचे ह्यडेंल लॉक झाल्याने रिक्षाने गरका घेऊन पुन्हा मागे वळून रस्त्यात उभ्या असलेल्या एका महिलेसह पादचारयांस धडक दिली.तेथील लोकांनी महिलेस बाजूला ओढ़ल्याने मोठी हानी टळली.या अपघातात दोन्ही गाड्याचे नुकसान होऊन चौघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post